तुम्हीही देशातील सर्वात मोठी खाजगी बँक एचडीएफसीचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे. एचडीएफसी बँकेने MCLR वाढवला असून या निर्णयामुळे ग्राहकांना गृहकर्ज, कार कर्ज, वैयक्तिक कर्ज यांवरचा ईएमआय वाढणार आहे. नवीन कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त व्याजदर द्यावे लागणार आहे. त्यामुळे बँकेतून कर्ज घेणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. हे नवीन दर उद्या म्हणजेच ८ फेब्रुवारीपासून लागू होणार आहे.
एचडीएफसी बँकेच्या वेबसाइटनुसार, MCLR 5 bps ८.८० टक्क्यांवरुन ८.९० टक्क्यांनी वाढवला आहे. एका महिन्याचा MCLR 5 bps ८.८५ टक्क्यांवरुन ८.९० टक्क्यांनी वाढला आहे. तर तीन महिन्यांचा MCLR बेस पॉइंट ८.१० टक्क्यांनी वाढवला आहे. तर सहा महिन्यांचा MCLR ९.३० टक्के झाला आहे.
MCLR म्हणजे काय?
MCLR म्हणजे मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड (Marginal Cost Of Fund). बँकेकडून घेतल्या जाणाऱ्या कर्जावर MCLR आकारला जातो. ठेवी दर, रेपो रेट, ऑपरेशनल कॉस्ट यांच्या आधारावर MCLR ठरवले जाते. याचा परिणाम कर्जाच्या व्याजदरावर होतो. त्यामुळे कर्जदाराचा EMI वाढतो. MCLR वाढीचा परिणाम गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्जांच्या व्याजदरावर दिसून येईल. यामुळे ग्राहकांना पूर्वीपेक्षा जास्त ईएमआय भरावा लागेल. तसेच नवीन कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना जास्त व्याजदर भरावे लागले.
Discussion about this post