सरकारी कंपनीत नोकरी करण्याचे स्वप्न पाहताय तर ही बातमी तुमच्यासाठी. हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये सध्या भरती सुरु असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या कंपनीत जर तुम्हाला काम करायचे असेल तर तुम्ही www.hindustancopper.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.
विशेष म्हणजे या सरकारी नोकरीसाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. फक्त इंटरव्ह्यूद्वारे तुमचे सिलेक्शन केले जाणार आहे. जे तरुण चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी ही उत्तम संधी आहे.
या पदांसाठी होणार भरती
सीनियर सब्जेक्ट एक्सपोर्ट मायनिंग, एनवायरमेंट पदासाठी २ जागा रिक्त आहे. सब्जेक्ट एक्सपोर्ट मायनिंग पदासाठी १ जागा रिक्त आहे. असोसिएट सब्जेक्ट एक्सपोर्ट ज्यूलॉजी पदासाठी १ जागा आहे. असिस्ंटट सब्जेक्ट एक्सपोर्ट ऑफिशियल लँग्वेज, मेडिकल प्रोफेशनल पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
सरकारी कंपनीतील या नोकरीसाठी पात्रतादेखील वेगवेगळी असणार आहे. सिनियर सब्जेक्ट मायनिंग पदासाठी उमेदवारांनी ग्रॅज्युएट किंवा मायनिंग इंजिनियरिंग केलेले असवे. एनवायरमेंट सिनियर सब्जेक्ट एक्सपोर्ट पदासाठी इंजिनियरिंग किंवा टेक्नोलॉजीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले असावे.
पगार
या नोकरीसाठी तुम्हाला दर महिन्याला फिक्स्ड वेतन मिळणार नाहीये. सीनियर सब्जेक्ट एक्सपर्ट, एसोसिएट सब्जेक्ट एक्सपर्ट और असिस्टेंट सब्जेक्ट एक्सपर्टची दर महिन्याला १६ विजिट असणार आहे. प्रत्येक विजिटला त्यांना ३५०० ते ६,२५० रुपये मिळणार आहे. म्हणजेच महिन्याला तुम्हाला १ लाख रुपये मिळू शकतात.















Discussion about this post