तुम्हीही सरकारी कंपनीत नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये भरती जाहीर करण्यात आली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी अर्ज करावेत.
हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये चार्जमन, इलेक्ट्रिशियन, WED पदांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहे. तुम्ही www.hindustancopper.com वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमध्ये १८ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
पगार
हिंदुस्तान कॉपर लिमिटेडमधील नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना २८,१२० ते ७२,११० रुपये पगार मिळणार आहे. याचसोबत इतर भत्तेदेखील मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा, ट्रेड टेस्ट अँड रायटिंग एलिजिबिलिटी टेस्टद्वारे होणार आहे.
पात्रता
चार्जमॅन पदासाठी इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगमध्ये डिप्लोमा आणि मायनिंग इन्स्टॉलेशनमध्ये १ वर्षांचा कामाचा अनुभव असावा. याचसोबत आयटीआयमध्ये ३ वर्षांचा मायनिंग इन्स्टॉलेशन सुपरवायजरचा अनुभव असायला हवा. इलेक्ट्रिशियन पदासाठी आयटीआयसोबतच इलेक्ट्रिशियन म्हणून ४ वर्षांचा अनुभव असायला हवे. WED पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. BA/B.Sc/B.com/BBA केलेले असावे. याचसोबत १ वर्षाचा कामाचा अनुभव असावा.















Discussion about this post