पुणे : राज्यात पूर्णपणे मान्सून सक्रिय झाला असला तरी अद्यापही काही जिल्ह्यांना पावसाची प्रतिक्षा आहे. अनेक ठिकाणी पावसाअभावी खरीप हंगामातील पेरण्या रडखडल्या असून बळीराजा संकटात सापडला आहे. काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट देखील ओढवलं आहे.
मात्र, राज्यातील पावसाच्या दृष्टीकोणातून पुढील ४ दिवस अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. कारण येत्या चार दिवसांत राज्यातील काही भागात जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.
येत्या चार दिवसात या भागात पाऊस झाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. बंगालच्या उपसागरावर CYCIR ची निर्मिती झाली आहे. तसेच NW दिशेने आत जाण्याची दाट शक्यता असल्याचे हवामान खत्याने म्हटले आहे.
यानंतर लगेचच आणखी एक CYCIR 19 जुलैपर्यंत बंगालच्या उपसागरात तयार होण्याची शक्यता देखील हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या दोन्ही प्रणालींमुळे महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान आजजळगाव जिल्ह्यात देखील पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याच दरम्यान अलर्ट जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे