भुसावळ | हतनूर धरणाच्या पाणलोटक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामूळे हतनूर धरणातून विसर्ग वाढवण्यात आला. मंगळवारी धरणाचे ४ दरवाजे अर्धा मिटर उघडून विसर्ग केला जात होता. मात्र आता सहा दरवाजे अर्धा मिटर उघडून विसर्ग केला जात आहे यामुळे तापीनदीचे पात्र खळाळले आहे.
हतनूर धरणाच्या पाणलोटक्षेत्रातील बऱ्हाणपूरला ३.४, देडतलाई ५.४, टेक्सा – ३१.८, एरडी, ३, गोपाळखेडा ४.२, – चिखलदरा १३८, लखपूरी १२.८, लोहारा – २१.२ तर अकोला येथे १५.४ मिली पाऊस झाला. यामुळे हतनूर धरणात बुधवारी – सकाळपासून पाण्याची आवक वाढली. – यामुळे सध्या धरणाचे सहा दरवाजे अर्धा मिटरने उघडून प्रती सेकंद १८० क्युमेक्स अर्थात ६ हजार ३५६ क्युसेक्स वेगाने विसर्ग करण्यात आला. यामुळे तापी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
परिसरातील भुजलपातळी पूनर्भरणासाठी विसर्ग व्हावा हतनूर धरणातून उजव्या तट कालव्यातून पूर्नभरणासाठी दरवर्षी विसर्ग केला जातो,
यंदाही काही दिवस विसर्ग करुन तो बंद करण्यात आला. तापीनदीत विसर्गासोबतच – कालव्यातून विसर्ग केल्यास रावेर, यावल व चोपडा तालुक्यातील कालव्याच्या – परिसरातील भुजलपातळी वाढेल. यामुळे हतनूर प्रशासनाने उजव्या कालव्यातून विसर्ग करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.















Discussion about this post