आज हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागत आहे. यात हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालात मोठा ट्विस्ट आला आहे. सकाळपासून आघाडीवर आणि नंतर बहुमताच्या दिशेने गेलेली काँग्रेस अचानक पिछाडीवर आली आहे. दुसऱ्या राऊंडनंतर भाजपने अचानक दमदार कमबॅक केलं आहे.
सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या राऊंडपासून काँग्रेसने चांगलीच आघाडी घेतली होती. पहिल्या फेरीनंतर काँग्रेस 51 जागांवर आघाडीवर होती. काँग्रेस बहुमताच्या पुढे गेल्याने काँग्रेस हरियाणात सत्ता स्थापन करेल असा कयास वर्तवला जात होता. तर या राऊंडमध्ये भाजप 31 जागांवर आघाडीवर होती. मात्र निकालात अचानक मोठा ट्विस्ट आला.
भाजपने अनपेक्षितपणे दमदार कमबॅक करत 38 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसने 31 जागांवर आघाडी घेतली आहे. अचानक झालेल्या या बदलामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. दोन्ही पक्षातील लढत रंगतदार होत आहे. त्यामुळे हरियाणाच्या लाल मातीच्या कुस्तीत कोण जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Discussion about this post