भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टेनिकोविकने लग्नाच्या 4 वर्षांनंतर वेगवेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. हार्दिक – नताशा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विभक्त झाल्याची माहिती चाहत्यांना दिली.
गेल्या काही दिवसांपासून हार्दिक आणि नताशा यांच्यात घटस्फोट झाल्याची केवळ चर्चा होती. मात्र दोघांकडून कुठलीही अधिकृत माहिती समोर आली नव्हती. अखेर दोघांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. हार्दिक पंड्या आणि नताशाने २०२० मध्ये लग्न केलं होतं त्यावेळी लॉकडाऊन सुरू होता. त्यानंतर अगत्य झाल्यानंतर ते पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकले होते. लग्नाच्या 4 वर्षांनंतर हार्दिकने घटस्फोट घेतल्याची बातमी दिली.
दरम्यान, दोघांना अगस्त्य नावाचा एक मुलगा आहे. दोघांचा घटस्फोट झाल्यानंतर अगत्य कोणाकडे राहणार? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यातच हार्दिकने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘ अगस्त्य आमच्या दोघांच्या आयुष्यातील एक भाग असेल. आम्ही दोघे त्याचं पालकत्व सांभाळणार आहोत. यासह आम्ही त्याला शक्य तितका आनंद देण्याचा प्रयत्न करू. आम्ही अशी आशा करतो की, आम्हाला तुमचा पाठिंबा मिळेल आणि तुम्ही आम्हाला समजून घ्याल.’
Discussion about this post