जळगाव । विवाहित महिलांचा छळ होणाऱ्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून अशातच जळगाव शहरात राहणाऱ्या एका विवाहितेला घर घेण्यासाठी माहेरहून पाच लाखांची मागणी करत छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेशवाडी येथील माहेर असलेल्या विवाहितेला घर घेण्यासाठी माहेरहून पाच लाखांची मागणी करत छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी
जळगाव शहरातील गणेशवाडी परिसरात माहेर असलेलया पुजा मुकेश जांगीड (वय-३४) यांचा विवाह मध्यप्रदेशातील जबलपूर येथील मुकेश राधेश्याम जांगीड यांच्याशी झालेला आहे. लग्न झाल्यानंतर काही दिवसात विवाहितेला किरकोळ व लहान गोष्टींवरून टोमणे मारणे सुरू झाले. हा प्रकार झाल्यानंतर पती मुकेश जांगीड याने घर घेण्यासाठी विवाहितेला माहेरहून पाच लाखांची मागणी केली. पैसे आणले नाही म्हणून सासू, सासरा, नणंद आणि माम सासरे यांनी मानसिक व शारिरीक छळ केला. हा प्रकार घडल्यानंतर विवाहिता माहेरी निघून आल्या.
मंगळवारी २५ जुलै रोजी दुपारी ५ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती मुकेश राधेश्याम जांगीड, सासू सुमित्रा राधेश्याम जांगीड, सासरे राधेश्याम महाविर जांगीड तिघे रा. जबलपूर, मध्यप्रदेश, नणंद निशा लोकेश शर्मा आणि माम सासरे सुभाष प्रभूदयाल जांगीड रा. भोपाल, मध्यप्रदेश यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार राजेंद्र उगले करीत आहे.