हिंदुस्तान एयरोनॉटिक्समध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना ही सुवर्णसंधी आहे. हिंदुस्तान एअरोनॉटिक्समध्ये सध्या विजिंटिंग कंसल्टंट (नेफ्रॉलॉजी) पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
एचएएलमध्ये नोकरीसाठी अर्ज करणाऱ्याची शेवटची तारीख २४ फेब्रुवारी २०२५ आहे. इच्छुक उमेदवारांनी त्याआधी अर्ज करायचा आहे.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा ६५ वर्षे असावे.या नोकरीसाठी उमेदवारांनी लवकर अर्ज करावेत.
पात्रता काय?
हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS केलेले असावे. याचसोबत MD (जनरल मेडिसिन)+ DM/DNB (नेफ्रोलॉजी) पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ५ वर्षांचा अनुभव असावा. या नोकरीसाठी अर्ज करताना बर्थ सर्टिफिकेट, शैक्षणिक प्रात्रतेचे सर्टिफिकेट, कामाच्या अनुभवाचे सर्टिफिकेट तुमच्याजवळ असायला हवे.
कसा अर्ज करावा?
या नोकरीसाठी अर्ज करताना उमेदवारांना वेबसाइटवर दिलेल्या फॉर्मॅटमध्ये अर्ज भरायचा आहे. त्यासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवायची आहेत. तुम्हाला अर्ड टीफ जनरल मॅनेजर (एचआर), औद्योगिक स्वास्थ केंद्र, हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड (बंगळुरु कॉम्पलेक्स), सुरंजनदास रोज, बंगळुरु-५६००१७ येथे पाठवायचा आहे.
Discussion about this post