मुंबई : सध्याच्या घडीला महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. सोनं-चांदी, भाजीपाला, तेल, साबण अशा अनेक गरजेपयोगी वस्तूंचे दरवाढ होत असल्यामुळे नागरिकांच्या खिशाला कात्री बसत आहे. आता ही महागाईची झळ केस कापण्यावरही येणार आहे.
वाढती महागाई पाहता सलून व्यावसायिकांकडूनही केस कापणं, दाढी करण्याच्या कामात दरवाढ करण्याची मागणी केली होती. त्या मागणीला आता मान्यता मिळाली असून १ जानेवारीपासून केस कापणं, दाढी करणं महाग होणार आहे. ही दरवाढ शहरासह ग्रामीण भागातही करण्यात येणार आहे, अशी माहिती सलून असोशिएशनचे मुंबई अध्यक्षांनी दिली.
विविध भागात वेगवेगळी दरवाढ
महाराष्ट्रातील विविध भागात असलेल्या सलून व्यवसायिकांच्या दरानुसार ही दरवाढ करण्यात येणार आहे. कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्याने इंधन दरातही वाढ झाली आहे, ज्याचा फटका सलून व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करून २० टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. मात्र, सलून व्यावसायिक २० टक्के वाढ करणार नसून ग्राहकांच्या सोयीसाठी ५ ते १० टक्के दरवाढ करणार आहेत
Discussion about this post