मुंबई । गुणरत्न सदावर्ते आणि त्यांची पत्नी जयश्री पाटील यांना सहकार खात्याने मोठा दणका दिला आहे. या दोघांचीही एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या तज्ज्ञ संचालकपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.
एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सहकार आयुक्तांकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. 4 ऑक्टोबर 2023 रोजी कामगार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष श्री. संदीप शिंदे यांनी सहकार आयुक्त यांच्याकडे केलेल्या तक्रारीनुसार सदावर्ते पॅनलच्या संचालकांनी यवतमाळ येथे एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी सर्व सभासदांना अहवालाचे वाटप करण्यात आले नव्हते. त्यावर नथुराम गोडसे यांचे फोटो प्रिंट करण्यात आले होते.वास्तविक पाहता एसटी बँक, एसटी कर्मचारी यांचा या राजकारणाशी काहीही संबंध नव्हता.
वार्षिक सर्वसाधारण सभा घेणे पूर्वी सर्व सभासदांना 14 दिवस आधी वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना देणे आवश्यक होते.परंतु अशा कुठल्याही सूचना या संचालक मंडळाकडून देण्यात आल्या नव्हत्या. आपल्या मर्जीतील सभासद बोलवून, हवे त्या विषयांना मंजुरी मिळवून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला. मुख्य म्हणजे पोटनियम बदलाची सुचना सभासदांना देणे बंधनकारक होते.या ठिकाणी बँकेचे तज्ञ संचालक म्हणून सदावर्ते पती-पत्नींची निवड बेकायदेशीर रित्या करण्याचा ठराव आणला तो ठरावही सहकार खात्याने रद्द केल्यामुळे आता यापुढे सदावर्ते पती-पत्नी स्वीकृत संचालक म्हणून राहणार नाहीत. बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष हे निर्वाचित संचालकांमधून असावेत असेही प्रकारचा ठराव त्यांनी बेकायदेशीररित्या केला होता. या ठरावाला सहकार खात्याने नामंजूर केले आहे.















Discussion about this post