जळगाव । ज्येष्ठ विधीतज्ञ उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभेच्या सदस्य म्हणून निवड झाली आहे. खासदारकीची शपथ घेतल्यानंतर उज्ज्वल निकम रविवारी जळगाव दाखल झाले. निकम यांच्या सत्कार संभारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी निकम यांच्या एका फोनमुळे मंत्री झाल्याचा मोठा गौप्यस्फोट केला.
गुलाबराव पाटील यांनी भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्याकडे आपण वशिला लावायचा प्रयत्न केला मात्र काम झालं नाही, असं म्हटलं आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी नुकतीच राज्यसभेची खासदारकी मिळालेले ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना भेट दिली होती आणि निकम यांनी त्यांच्या समर्थनार्थ एक फोन केल्यावरच त्यांना सहकार मंत्रिपदाची संधी मिळाली होती. असं गुलाबराव पाटील म्हणाले
जिल्ह्याची राजकीय ताकदीचा पाढाच वाचला
“जळगाव जिल्हा हा सगळ्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. राजकीयदृष्ट्या बघितलं तर एक केंद्रीय मंत्री आहे, तीन मंत्री, 11 आमदार, एक विधान परिषद आमदार आहे. उज्वल निकम आणि स्मिता वाघ खासदार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागात अडचणी असलेल्या प्रश्नांचा सुद्धा लवकर निपटारा होईल,” असा विश्वास मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. अनेक थोर महान व्यक्तींनी जळगावात वास्तव्य केले. आज येथील उज्जवल निकम खासदार झालेत. पालकमंत्री म्हणून मी त्यांचे अभिनंदन करतो, असं गुलाबराव पाटील म्हणाले. यावेळी गुलाबराव पाटील यांनी यावेळी एक किस्सा आवर्जून सांगितला.
Discussion about this post