जळगाव : शिवसेना पक्षात एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील शिंदे गटात जाणार नसल्याचे बोललं जात होत. गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंना का सोडलं? शिंदे गटात का गेले? याबाबतचा खुलासा केला आहे.
स्वतः एकनाथ शिंदे यांनी फोन केल्याने मी शिंदे गटासोबत गेल्याचं स्वतः गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. गुलाबराव पाटील यांनी जळगाव तालुक्यातील रीधुर गावातील अवचित हनुमान मंदिरावरील विकास कामांच्या सोहळ्यात जोरदार फटकेबाजी केली.
पुढे गुलाबराव पाटील म्हणाले की, आम्ही कोणत्याही प्रकराची गद्दारी केलेली नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आमच्या हातात जो भगवा झेंडा दिला होता. तोच भगवा झेंडा हातात घेऊन आम्ही आजही काम करत आहोत आणि उद्याही करत राहणार. एवढंच काय तर भगवा झेंडा हातात घेऊन मरेपर्यंत करणार असल्याचेही गुलाबराव पाटील म्हणाले. ते पुढे म्हणाले की, माझ्या मतदारसंघात गुलाबराव पाटील यांचा निधी पोहचला नाही किंवा निधीपासून कोणते गाव वंचित राहिलेले तुम्हाला दिसणार नाही.
ते म्हणाले की, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही. आज अभिमान वाटतो की, तो निर्णय घेतला नसता तर कदाचित आज एवढी कामे झाले नसते. नुसते गावात आपला सरपंच जरी नसला तरी किती हाल होता. सरपंच्यांच्या बाजूच्या माणसाच्या पोलवर गावात लाईट लागतो. विरोधकाच्या पोलवर लाईट लागत नाही. एकनाथ शिंदे हा 16 महिन्यांमध्ये दहा वेळा जळगाव जिल्ह्यामध्ये येणारा एकमेव मुख्यमंत्री असल्याचेही गुलाबराव म्हणालेत.
Discussion about this post