मुंबई । काल राज्यातील महायुती सरकारने पत्रकार परिषद घेत हिंदी सक्तीसाठी काढलेले दोन्ही जीआर रद्द केले आहेत. तरी देखील शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख यांनी हिंदी सक्तीवरुन विजयी मेळाव्याचे आयोजन केलं आहे. येत्या 5 जुलै रोजी हा विजयी मेळावा होणार आहे. मात्र त्यापूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत मोर्चाबाबत भाष्य केलंय. ते म्हणाले की, ‘मोर्चा एकत्र काढण्याचं आमचं ठरलं होतं. आमचा मोर्चा सोमवारी ७ जुलैला काढणार होतो, आणि राज ठाकरेंचा मोर्चा रविवारी ६ तारखेला निघणार होता. पण आम्ही आता शनिवारी ५ तारखेला विजयी मोर्चा काढणार आहोत’, असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान यावेळी त्यांनी संजय राऊत पुढे म्हणाले की, ‘आमचे आणि राज ठाकरेंचे विचार मिळतेजुळते आहेत. त्यातून विजयी मोर्चा आपण काढायचा हा विचार पुढे आला, आणि मुळात राज ठाकरेंनीच हे मला सूचवलं. राज ठाकरे म्हणाले की, दोन्ही एकाच कुटुंबातील आहोत, दोन्ही ठाकरे आहोत, त्यामुळे चित्र चांगलं दिसणार नाही. त्यावर त्यांनी वरळीच्या डोंबला हा विजय मोर्चा करायचं देखील त्यांनी सूचवलं’, असं संजय राऊत म्हणाले.
‘माणसं सोडून गेली, आमदार गेले, खासदार गेले हे खरंय, पण त्याला मी कसाकाय जबाबदार? कुणी तरी मला समजावून सांगायला पाहिजे की तुम्ही जबाबादार आहात. एकनाथ शिंदे माझ्यामुळे गेले? ते सर्व लोकं ईडी, सीबीआय आणि आपल्या प्रॉप्रर्टी वाचविण्यासाठी तिकडे गेले. तुरुंगात जाण्याची त्यांना भीती वाटली. मी पण तुरुंगात गेलो, मग मी पण पक्ष सोडून जायला पाहिजे होतं. गुलाबराव पाटलांच्या बँक खात्यात ५० कोटी रुपये बेकायदेशीपरणे जमा झाले. ते पक्ष सोडताना थरथर करत होते उद्धव ठाकरेंसमोर की, मला ईडीवाले घेऊन जातील मला जावं लागेल. हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय यांचे नखरे आणि यांचा डरपोकपणा’, असं म्हणत संजय राऊतांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.















Discussion about this post