जळगाव । शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आजारपणामुळे रुग्णालयात उपचार घेत असून यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांपासून आणि जीवनापासून दूर आहे. मात्र त्यांच्या आजारपणावरून मंत्री गुलाबराव पाटलांनी टोला लगावला आहे. फ्रेश रहा, जीव कधी जाईल सांगता येत नाही असे विधान पाटलांनी केले.
सध्या संजय राऊत हे रुग्णालयात उपचार घेत असून, त्यांनी रुग्णालयातून हात लिहिता राहिला पाहिजे असा आशयाचा फोटो ट्वीट केला होता. याच संदर्भात गुलाबराव पाटलांनी राऊतांच्या आजारपणाची टिंगल उडवल्याचे दिसून आले. लोकप्रतिनिधींनी नेहमी फ्रेश राहावे, कारण कोणाचा जीव कधी जाईल हे सांगता येत नाही, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले. त्यांनी स्वतःचाही उल्लेख करत ही परिस्थिती कोणावरही येऊ शकते असे सूचित केले.
पुढे बोलताना, गुलाबराव पाटलांनी जिजाऊ मातेकडे सत्यानाश करणाऱ्या लोकांना चांगली बुद्धी दे अशी प्रार्थना केली. जर अशा लोकांना चांगली बुद्धी मिळाली, तर उद्धव ठाकरे यांचा प्रभाव टिकून राहील, अन्यथा ते पुढच्या वेळी एकटेच राहतील, असे राजकीय भाष्यही गुलाबराव पाटील यांनी केले. या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या सत्तासंघर्षातील टीका-टिप्पणी अधिक तीव्र झाल्या आहेत.















Discussion about this post