जळगाव : जळगाव ग्रामीण मतदार संघात जळगाव लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचाराला वेग आला असून या प्रचारात मंत्री गुलाबराव पाटील देखील सहभागी झाले आहे. या दरम्यान मंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. जळगाव ग्रामीण मतदार संघ हा आमचा बालेकिल्ला असून तो अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. प्रत्येक पक्षाचा नेता हा आपल्या उमेदवारासाठी प्रयत्न करत असतो. शरद पवार यांच्या सभांचा फारसा फरक पडणार नाही. आम्ही आतापर्यंत फर्स्टक्लासनेच पास झालो आहोत; असे मत मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.
काही शिवसेनेचे कार्यकर्ते काम करत नाही. काही भाजपचे कार्यकर्ते काम करत नाही. मात्र मी असं म्हटलं आहे कोणी काम करो न करो मात्र शिवसैनिक हा काम करत राहील करण पवार ईव्हीएम मशीनबद्दल आता बोलत आहे. मात्र ईव्हीएम मशीन हे सुप्रीम कोर्टाने सुद्धा मान्य केलं असून हा त्यांचा रडीचा डाव आहे. उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना म्हटले होते की नरेंद्र मोदी हे दुर्दैवी पंतप्रधान.
यावर गुलाबराव पाटील म्हटले आहे हे त्यांचं मत असून लोकांनी मान्य केलेल्या व्यक्तीच्या बाबतीत असे बोलणे उचित नाही. तसेच जितेंद्र आव्हाड यांनी नरेश मस्के यांच्यावर टीका करताना एक गद्दार हा राजन विचारे यांच्यासमोर उभा आहे. पण जितेंद्र आव्हाड यांनी आम्हाला सर्टिफिकेट देण्याची गरज नाही नरेश मस्के हे शिवसैनिक आहे; असे मात्र मंत्री गुलाबराव पाटील यांनी मांडले.
Discussion about this post