जळगाव । एकनाथ शिंदे यांना मंत्रिपद देऊनही निर्लज्ज पणाने त्यांनी पक्ष फोडला, अशी टीका ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात केली होती . त्यांच्या या टिकेवरून आता राज्याचे शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे,
गुलाबराव पाटील म्हणाले की, आदित्य ठाकरे यांच्याकडे आता कोणतेही भांडवल शिल्लक राहिले नाही. गल्ली बोळातील नेत्यांच्या सारखी त्यांची अवस्था झाली आहे. आता केवळ म्याव म्याव करण्याचे ते आता काम करत असल्याची टीका त्यांनी केली आहे.
दोन्ही समाजांना न्याय मिळणार – गुलाबराव पाटील
उद्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन होत आहे. याबाबत गुलाबराव पाटील म्हणाले की, उद्याच्या अधिवेशनात मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत शिक्कामोर्तब होईल. मराठा समाज आणि ओबीसी समाज या दोघांना न्याय मिळेल, असा विश्वास यावेळी गुलाबराव पाटलांनी व्यक्त केला. तसेच त्यांनी जनतेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
Discussion about this post