जळगाव : राजकारणात कधी काय होईल याचा नेम नाही. महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या वर्षी मोठा राजकीय भूकंप घडून आला होता. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली. यानंतर गेल्या आठवड्यात अजित पवार यांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये फूट पडली. दरम्यान अशातच पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी एक मोठा खळबळजनक दावा केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आलं आहे.
राष्ट्रवादी बरोबर आता काँग्रेसचे देखील आमदार फुटणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. पुढे ते म्हणाले, ते कोणाकडे जातील हे मात्र सांगता येणार नाही. जळगावात प्रसार माध्यमांशी संवाद साधतांना गुलाबराव पाटील यांनी हा खळबळजनक दावा केला आहे.
अजित पवार भाजपसोबत येतील याची कल्पना होती का? असं विचारलं असता, गुलाबराव पाटील म्हणाले की, कुणालाच याची कल्पना नव्हती. मात्र दोन महिन्यापूर्वीच मी माझा अंदाज सांगितलं होता. आणि आज तो खरा ठरला आहे. असं गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.
Discussion about this post