जळगाव । शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर हे विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा आहे. यावरून शिवसेनेचे बडे नेते आणि माजी मंत्री गुलाबराव पाटील तीव्र शब्दात प्रक्रिया दिलीय.
गुलाबराव पाटील म्हणाले, जिल्हा बँक, मजूर फेडरेशन, अटलांटा या घोटाळ्यांमध्ये अडकू नये, स्वतःच्या बचावासाठी गुलाबराव देवकर कोणत्या ना कोणत्या पक्षाकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आम्ही काही त्यांना सोडणार नाही. मी त्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार आहे, अशी थेट धमकी वजा इशारा माजी मंत्री गुलाबराव पाटील यांनी गुलाबराव देवकर यांना दिला आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर यांच्या अजित पवार गटातील प्रवेशावर बोलताना शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, गुलाबराव देवकर यांना पक्ष बदलाची काय घाई झाली आहे. लगेच आठ दिवसांमध्ये या माणसाला पळावे लागत आहे. कारण त्यांनी जिल्हा बँकेत घोटाळा केला आहे. मजूर फेडरेशनचा दहा कोटींचा विषय आहे.
Discussion about this post