जळगाव । मंत्री गुलाबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार गटाचे नेते गुलाबराव देवकर यांनी लोकसभा निवडणूक भाजपला मदत केल्याचा आरोप केला आहे. यावरून गुलाबराव देवकर यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना फटकारलं आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमच्या महाविकास आघाडीमध्ये लावा लावी करायचं काम करू नये, असे गुलाबराव देवकर म्हणाले आहे.
मी जर लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला मदत केली असेल तर गुलाबराव पाटलांनी हे सिद्ध करावे राजकारणातून संन्यास घेईल. तर भाजपला मदत केल्याचा एक तरी पुरावा किंवा उदाहरण मंत्री गुलाबराव पाटील यांनी दाखवावं हे माझ्या संपूर्ण राजकीय जीवन थांबवतो, असे म्हणत गुलाबराव देवकर यांनी गुलाबराव पाटील यांना आव्हान दिलं आहे.















Discussion about this post