बुलढाणा । महाराष्ट्रासह बुलडाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ढगफुटी झाल्यामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. यामुळे शेतकरी पूर्णतः खचून गेला असून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान यातच राष्ट्रवादी शरद पवार गटाने बुलडाणा जिल्ह्याचे दोन्ही पालकमंत्री हरवल्याची तक्रार दिल्याने खळबळ उडाली आहे.
पालकमंत्री मकरंद पाटील यांच्यासह पालकमंत्री संजय सावकारे गायब झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. जिल्ह्याला 2 पालकमंत्री असूनही अतिवृष्टीत जिल्हा अनाथ झाल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने तात्काळ मदतीची गरज असतांना बुलडाणा जिल्ह्याला 2 पालकमंत्री आहेत. मात्र त्यातील एकही पालकमंत्री अजूनही जिल्ह्यात दाखल झाला नाही. त्यामुळे दोन्ही पालकमंत्री हरवल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली असून त्यांना शोधून देण्याची मागणी बुलडाणा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाने केली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात दुसरबीड आणि सोनोशी महसूल मंडळात झालेल्या ढगफुटीने शेतकऱ्यांचे अक्षरश कंबरडे मोडले आहे. होत्याचं नव्हते झाले आहे. नदी काठावरील शेती तर खरडून गेलीय. उभी पीक पाण्यात वाहून गेल्याने सिंदखेड राजा तालुक्यातील सोनोशी, वर्दाडी, गारखेड, रुम्हनासह परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात आजही पाणी असून पीक सडत आहेत. सरकारने जी मदत जाहीर केली ती अतिशय तुटपुंजी असून जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, हेक्टरी 50 हजार मदत करावी, मागील पिक विमा तत्काळ द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.















Discussion about this post