आज जीएसटी कौन्सिलची बैठक होणार आहे.या जीएसटी बैठकीत कर स्लॅबमध्ये बदल केले जाणार आहेत. यामुळे सर्वसामान्यांना मात्र दिलासा मिळणार आहे. १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्रदिनी पंतप्रधान मोदींनी जीएसटी रचनेत व्यापक सुधारणा करण्याची घोषणा केली होती. त्याच पार्श्वभूमीवर ही जीएसटी परिषदेची बैठक महत्त्वाची ठरणार आहे.
जीएसटी परिषदेच्या या बैठकीत दैनंदिन वापरातील वस्तूंवरील जीएसटी दर कमी करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. यामध्ये तूप, बटर, टूथपेस्ट, शॅम्पू, चीज, दूध, पावडर, सिमेंट आणि कारच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. या वस्तूंवरील जीएसटी दर कमी केला जाऊ शकतो. यामुळे थेट सर्वसामान्य ग्राहकांना आणि लहान व्यावसायिकांना फायदा होणार आहे.
जीएसटी कौन्सिलच्या या बेठकीत २ स्लॅब कमी करण्याची घोषणा केली जाऊ शकते. २८ आणि १२ टक्के स्लॅब रद्द करुन त्याऐवजी ५ आणि १८ टक्के स्लॅब ठेवण्यात येईल. सध्या २५० पेक्षा जास्त वस्तूंवर १२ टक्के कर लागतो. त्यापैकी २२३ वस्तू ५ टक्के आणि उर्वरित वस्तू १८ टक्के स्लॅबमध्ये ठेवण्यात येईल. त्याचप्रमाणे ३० वस्तू या २८ टक्के स्लॅबमध्ये आहेत. त्यावर १८ टक्के स्लॅब लावण्यात येण्याची शक्यता आहेत. ज्या उत्पादनावर सध्या २८ टक्क्यांपेक्षा कमी कर आकारला जातो. त्यात वाहनांचे पार्ट्स, एसी, टेलिव्हिजन, मोटारसायकल यांचा समावेश आहे.
कपडे, शूजपासून ते कारपर्यंत या गोष्टी होणार स्वस्त
जीएसटी कौन्सिलच्या या बैठकीत कपडे ५ टक्के कर स्लॅबमध्ये समावेश करण्याची शक्यता आहे. याचसोबत अन्नपदार्थांवरील जीएसट कमी केला जाऊ शकतो. सिमेंटवरील जीएसटीदेखील कमी केली जाऊ शकतो. सध्या यावर २८ टक्के जीएसटी आकारला जातो. हा १८ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. याचसोबत टर्म इन्श्युरन्स आणि आरोग्य विम्यावरील जीएसटी रद्द केला जाऊ शकतो.
कारवरील जीएसटी १० टक्क्यांनी होणार कमी
वाहनांवरील जीएसटी दर २८ वरुन १८ टक्के होण्याची शक्यता आहे. सध्या या वाहनांवर २८ टक्के जीएसटी आणि २२ टक्के उपकर आकारला जातो. यामध्ये कपात केली जाऊ शकतो. या वाहनांवर सध्या ५० टक्के कर भरावा लागतो. जर जीएसटी दर कमी झाला तर एकूण दर ४० टक्के होईल. यामुळे कार खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.















Discussion about this post