जळगाव । जळगाव महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवड प्रक्रियेत आज महत्त्वाची घडामोड झाली असून सातपैकी पाच उमेदवारांच्या नावांना मंजुरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र उर्वरित दोन जागांबाबतचा निर्णय अद्याप प्रलंबित ठेवण्यात आल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता कायम आहे.
महापौर दीपमाला काळे, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे आणि विविध गटनेत्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या छाननी प्रक्रियेत भाजपचे डॉ. राधेश्याम चौधरी, प्रदीप रोटे व रमेश मताणी तसेच शिवसेनेचे हर्षल मावळे आणि नरेंद्र सोनवणे यांच्या नावांना प्राथमिक मंजुरी देण्यात आली. त्यामुळे यांच्या स्वीकृत नगरसेवकपदासाठी मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, काही उमेदवारांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळल्याने त्यांना दुरुस्तीसाठी २ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तसेच शिवसेना-उबाठा पक्षाच्या गटनेतेपदाच्या वादाचा मुद्दा विभागीय आयुक्तांकडे प्रलंबित असल्याने संबंधित प्रस्तावावरही अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे उर्वरित दोन जागांवर कोणाची वर्णी लागणार, याकडे जळगावच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.















Discussion about this post