तुम्हीही सरकारी बँकेत नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) ने पीओ भरती २०२५ ची अधिसूचना जारी केली आहे. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जुलै २०२५ आहे इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट ibps.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.या भरतीद्वारे एकूण ५२०८ जागा भरल्या जाणार आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज करावा.
बँकनिहाय रिक्त पदांची माहिती
बँक ऑफ बडोदा – १०००
बँक ऑफ इंडिया – ७००
बँक ऑफ महाराष्ट्र – १०००
कॅनरा बँक – १०००
सेंट्रल बँक ऑफ इंडिया – ५००
इंडियन ओव्हरसीज बँक – ४५०
पंजाब नॅशनल बँक – २००
पंजाब अँड सिंध बँक – ३५८
पात्रता निकष
मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवीधर पदवी अनिवार्य आहे.
वयोमर्यादा:
१ जुलै २०२५ रोजी उमेदवारांचे वय २० ते ३० वर्षांच्या दरम्यान असावे. सरकारी नियमांनुसार राखीव श्रेणीतील उमेदवारांसाठी वयात सूट लागू आहे. अर्ज करण्यासाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइट ibps.in ला भेट देऊ शकतात.
अर्ज कसा करावा
IBPS ibps.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
होम पेजवर दिलेल्या PO अर्ज लिंकवर क्लिक करा.
आता तपशील प्रविष्ट करून नोंदणी करा आणि फॉर्म भरा.
आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
शुल्क भरा आणि सबमिट करा.
Discussion about this post