जळगाव : जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी सोमवारी सायंकाळी वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यादम्यान जळगाव तालुक्यातील धानवड शिवारामध्ये दुर्दैवी घटना घडली. वीज कोसळल्यामुळे नातवाचा मृत्यू झाला आहे तर आजोबा गंभीर जखमी झाले आहेत.
मक्याच्या शेतात राखण करण्यासाठी आजोबा आणि नातू गेले होते, तेव्हा त्यांच्या अंगावर वीज कोसळली. या दुर्दैवी घटनेमध्ये 15 वर्षांचा नातू अंकुश राठोड याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आजोबा शिवाजी राठोड हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी शिवाजी राठोड यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
जळगाव जिल्ह्यामध्ये सोमवारी संध्याकाळी 7.15 च्या सुमारास तुरळक स्वरुपाच्या अवकाळी पावसाला सुरूवात झाली. या अवकाळी पावसामुळे ज्वारीसह इतर पिकांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. हवामान तज्ज्ञांनीही पावसाची शक्यता वर्तवली होती















Discussion about this post