जळगाव : आज राज्यातील ग्राम पंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर यात जळगाव जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मंत्री गुलाबराव पाटील यांचा करिष्मा कायम आहे. जळगाव ग्रामीणमध्ये शिंदे गटाने घवघवीत यश मिळवलय.
ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्याखालोखाल अजित पवार गट दुसऱ्या स्थानावर आहे. एकूण 2359 ग्राम पंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. शिवसेनेत सध्या दोन गट आहेत. शिंदे गट आणि ठाकरे गट. या दोन गटात शिंदे गटाने बाजी मारली आहे. आतापर्यंतच्या हाती आलेल्या निकालानुसार जळगाव ग्रामीणमध्ये 34 पैकी 29 ग्रामपंचायतीवर शिवसेना शिंदे गटाचा भगवा फडकला आहे.ल यांनी दिली आहे.
मंत्री गुलाबराव पाटील यांच्यातर्फे विजय उमेदवार सदस्यांचा सत्कार करण्यात आला. या निकालानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केलीय. “विरोधक आहेत तरी कुठे? असा थेट सवाल करत टीका करणाऱ्या विरोधकांना आव्हान दिलं आहे”
Discussion about this post