चोपडा : ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीने तयार केलेल्या’ ‘ग्राहक पंचायत महाराष्ट्र:’दिनदर्शिकेचे प्रकाशन तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अशासकीय सदस्य तथा जिल्हा सचिव उदयकुमार अग्निहोत्री, तालुकाध्यक्ष राजेश आर. गुजराथी ,डॉ. पृथ्वीराज सैंदाणे ,अनिल बारी, पुरवठा शाखेचे अधिकारी श्री. नेतकर यांच्यासह ग्राहक पंचायतचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. याप्रसंगी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी ग्राहक पंचायतीचे मार्गदर्शन केंद्र ग्रामीण भागात सुरु करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
दिनदर्शिकेचे प्रकाशन झाल्यानंतर शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन, एसटी आगार यासह शासकीय कार्यालयात दिनदर्शिकेचे वितरण करण्यात आले. तसेच ‘ग्राहक पंचायत महाराष्ट्र घरोघरी’हे अभियान देखील राबविण्यात आले.
Discussion about this post