जळगाव । पवित्र पोर्टलसाठी अर्ज करणाऱ्या अर्जदार विद्यार्थ्यांना अर्जा साठी पदवीप्रमाणपत्राची आवश्यकता होती. त्यासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना पवित्र पोर्टलसाठीच्या मुदतीच्या आत पदवीप्रमाणपत्र विद्यापीठाने तात्काळ उपलब्ध करुन दिले.
तात्काळ पदवीप्रमाणपत्रासाठी ३० ते ४५ दिवसांचा कालावधी लागत असतो. यामुळे अनेक विद्यार्थी वंचित राहण्याची शक्यता लक्षात घेता विद्यापीठ विकास मंचच्या पदवीधर सिनेट सदस्य विभागप्रमुख नितीन ठाकूर,सिनेट सदस्य अमोल मराठे, सौ.स्वप्नाली महाजन- काळे, दिनेश खरात, दिनेश चव्हाण,सुनिल निकम,अमोल सोनवणे यांनी पवित्र पोर्टलसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तात्काळ मुदतीच्या आत पदवीप्रमाणपत्र मिळावे यासाठी कुलगुरू डॉ.व्ही.एल्. माहेश्वरी यांना निवेदन दिले होते.
विद्यार्थी हित लक्षात घेता विद्यापीठ विकास मंचच्या निवेदनाची कुलगुरूंनी दखल घेऊन विद्यापीठ प्रशासनाने तात्काळ पाऊले उचलून अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना पवित्र पोर्टलच्या मुदतीच्या आत पदवीप्रमाणपत्राची सॉफ्ट कॉपी उपलब्ध करून दिली.
यासाठी विद्यापीठाच्या परिक्षा विभागातील व पदवीप्रदान कक्षातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी अहोरात्र मेहनत घेतली.
Discussion about this post