मुंबई । राज्यात महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत देण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या सरकारने घेतला होता. मात्र, या योजनेमुळे एसटी महामंडळ तोट्यात गेल्याचा दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
एका पत्रकार संघटनेच्या कार्यक्रमात पत्रकारांना एसटीमध्ये सवलत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. यावेळी बोलताना सवलतीमुळेच एसटी बस तोट्यात असल्याचे म्हटले आहे. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दिलेल्या सवलतींमुळे एसटी तोट्यात असल्याचे विधान सरनाईक यांनी केलं.
यामुळे महामंडळाला दररोज 3 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.
त्यामुळे यापुढे एसटीमध्ये कोणतीच सवलत दिली जाणार नाही. लाडक्या बहिणींना बसमध्ये 50% सवलत ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस या सवलतीमुळे परिस्थिती अशी झाली आहे, असे सरनाईक यांनी म्हटले आहे.
महिलांना दिलेल्या सवलतीबाबत बोलताना सरनाईक म्हणाले की, बहिणींना 50 टक्के सवलत, जेष्ठ नागरिकांनाही बसमध्ये सवलत दिली आहे. त्या सवलतींमुळे एसटी बस दरदिवशी तब्बल ३ कोटी रुपये तोट्यात आहे. आपण सर्वांनाच सवलत देत बसलो तर मला असे वाटते की एसटी महामंडळ चालवणे कठीण होईल. यावेळी बोलताना त्यांनी सर्वांनाच सवलत देणे शक्य नसल्याचेही स्पष्ट केले.
Discussion about this post