ग्राहक व्यवहार विभागांतर्गत येणाऱ्या भारतीय मानक ब्युरोकडून सल्लागार पदांसाठी नोटिफीकेशन जारी करण्यात आलं आहे. तरुणांसाठी नोकरीची ही उत्तम सुवर्णसंधी आहे.
नोटिफीकेशनुसार या विभागामध्ये आयुष, स्थापत्य, रसायन, परिवहन, अभियांत्रिकी यासह विविध पदांसाठी भरती होणार आहे. एकूण 107 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
पात्र उमेदवार या विभागाची अधिकृत वेबसाईट असलेल्या bis.gov.in वर जाऊन आपला उमेदवारी अर्ज भरू शकतो. तीस डिसेंबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तुम्ही 19 जानेवारीपर्यंत अर्ज करू शकता
आवश्यक पात्रता :
या विभागात भरतीसाठी वेगवेगळी पात्रता आणि निकष आहेत, ज्यामध्ये अभियांत्रिकी, पीएचडी, पदवी अशा स्वरुपाच्या पात्रतेचा समावेश आहे. पात्रतेसोबत काही पदांसाठी किमान पाच ते दहा वर्षांचा अनुभव देखील आवश्यक आहे. बीएसआयच्या वेबसाईटवर पात्रतेसंदर्भात डिटेल माहिती देण्यात आली आहे.
निवड आणि पगार
विविध पदांसाठी प्राप्त झालेल्या अर्जामधून शिक्षण आणि अनुभवाच्या आधारे काही उमेदवार शॉटलिस्ट केले जातील. त्यानंतर त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. मुलाखतीनंतर ज्यांनी निवड होईल त्यांना वर्षभरासाठी 75 हजार एवढा पगार मिळेल.
Discussion about this post