सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सीएसआयआर-भारती पेट्रोलियम संस्थेत भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. शास्त्रज्ञ पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीबाबत सर्व माहिती तुम्हाला iip.res.in या वेबसाइटवर मिळेल. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १४ एप्रिल म्हणजे आजपासून सुरु होणार आहे.
सीएसआयआर-आयआयपीमध्ये एकूण ९ पदांसाठी भरती केली जाणार आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ मे २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी विविध प्रवर्गातील उमेदवारांसाठी जागा राखीव आहे. सामान्य प्रवर्गासाठी ४ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर इतर प्रवर्गासाठी उरलेल्या जागा राखीव आहेत. एकूण ९ पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.
या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे असायला हवी. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून एम.ई/एम.टेकसोबत पीएचडी केलेली असावी.
किती पगार मिळेल?
या नोकरीसाठी उमेदवारांना ६७,७०० ते २,०८,७०० रुपये पगार मिळणार आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत सीएसआयआर संस्था काम करते. या संस्थेत जास्तीत जास्त रिसर्च होते. त्यामुळे चांगल्या संस्थेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.
फ्रेशर असाल आणि करिअरची सुरुवात करायचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. तुम्ही चांगल्या सरकारी कंपनीत काम करु शकतात. या कंपनीत काम केल्याच्या अनुभवाचा तुम्हाला भविष्यातदेखील फायदा होणार आहे.
Discussion about this post