मुंबई । सध्या लग्नसराईचा मुहूर्त सुरू असल्यामुळे सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी पाहायला मिळत असून लग्नासाठी सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आज सोन्याच्या दरात किंचित घट झाली आहे
आज सोन्याची किंमत 220 रुपयांनी कमी झाली आहे. आज भारतात 22 कॅरेट सोन्याचा दर 5,695 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 6,213 रुपये प्रति ग्रॅम आहे.
सोने-चांदीच्या दरात किंचित घट
आज 12 डिसेंबर रोजी सोन्याच्या दरात काहीशी घट झाली आहे. आज 18 कॅरेट सोन्याचा दर 46,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, 22 कॅरेट सोन्याची किंमत 56,950 रुपये प्रतितोळा आहे, तर 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 62,130 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. यासोबतच आज चांदीच्या दरातही (Silver Price) घट झाली आहे. आज एक किलो चांदीचा दर 75,800 रुपये आहे. सोमवारी हा भाव 76,000 रुपये आहे.
देशातील चार प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर
मुंबई – मुंबईत सोन्याचा दर 62,130 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे.
दिल्ली – दिल्लीत सोनं 64350 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे.
कोलकाता – कोलकात्यात सोन्याचा आजचा दर 62,130 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चेन्नई – चेन्नईत आज सोन्याचा दर 62730 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
Discussion about this post