नवी दिल्ली । दिवाळीसारखा सण अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला आहे. अशा स्थितीत अनेक लोक सोने खरेदी करतात. मात्र मागील गेल्या काही दिवसापूर्वी सोन्याच्या किमतीने मोठी उसळी घेतल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. दरम्यान, आज सकाळी भारतीय सराफा बाजारात सकाळी सोन्याच्या किमतीत घसरण आणि चांदीच्या किमतीत वाढ दिसून आली.
मात्र, सोन्याचा भाव अजूनही 60 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे आहे. त्याचवेळी, चांदीचा भाव प्रतिकिलो 71 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 60985 रुपये आहे. चांदीची किंमत 71470 रुपये आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, बुधवारी संध्याकाळी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 61012 रुपये प्रति 10 ग्रॅम होता, जो आज (गुरुवारी) सकाळी 60985 रुपयांवर आला आहे. तसेच शुद्धतेच्या आधारे सोने स्वस्त झाले असून चांदी महाग झाली आहे.
आज सोन्या-चांदीचा भाव किती आहे?
ibjarates.com या अधिकृत वेबसाइटनुसार, आज सकाळी 995 शुद्धतेच्या दहा ग्रॅम सोन्याची किंमत 60741 रुपयांपर्यंत खाली आली आहे. त्याच वेळी, 916 (22 कॅरेट) शुद्धतेच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत आज 55862 रुपये झाली आहे. याशिवाय 750 शुद्धतेच्या (18 कॅरेट) सोन्याचा भाव 45739 रुपयांवर आला आहे. त्याचवेळी 585 शुद्धतेचे (14 कॅरेट) सोने आज 35676 रुपयांनी स्वस्त झाले आहे. याशिवाय 999 शुद्धतेची एक किलो चांदी आज 71470 रुपयांनी महागली आहे.















Discussion about this post