जळगाव । धनतेरस आणि दिवाळीला सोने खरेदी करणे शुभ मानतात. उद्या धनत्रयोदशी आहे. मात्र, त्यापूर्वीच सोने आणि चांदी दराने मोठी उसळी घेतली. सातत्याने होत असलेल्या दरवाढीने दोन्ही धातूंचे दर गगनाला भिडले आहे. दरम्यान, धनत्रयोदशीच्या आदल्या दिवशी देखील सोने आणि चांदी दरात मोठी वाढ दिसून आल्याने खळबळ उडाली.
आज शुक्रवारी सकाळी बाजार उघडताच जळगाव सराफ बाजारात सोने दरात पुन्हा ३३९९ रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याने एक लाख ३५ हजार ४४५ रूपयांचा नवीन उच्चांक केला. दररोज दरवाढ होत असल्याने सोने गेल्या आठवडाभरात ८३४३ रुपयांनी वधारले आहे.
चांदीत १०३० रूपयांनी वाढ
दुसरीकडे शुक्रवारी सकाळी बाजार उघडताच पुन्हा १०३० रूपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदी जीएसटीसह प्रति किलो एक लाख ८१ हजार २८० रूपयांपर्यंत जाऊन पोहोचली. यापूर्वी काल गुरूवारी दिवसभरात तब्बल १० हजार ३०० रुपयांची घट नोंदवली गेल्याने चांदी जीएसटीसह प्रति किलो एक लाख ८० हजार २५० रूपयांपर्यंत घसरली होती. आठवडाभरात २९ हजार ८७० रुपयांची दरवाढ झाल्यानंतर चांदी दोन लाखांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.
धनत्रयोदशी आणि दिवाळी जवळ आली असताना सोन्याच्या वाढत्या किमतींमुळे ग्राहकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. यावर्षी जास्त किंमतींमुळे ग्राहक सोन्याची खरेदी कमी करण्याची शक्यता व्यक्त होत आहे















Discussion about this post