मुंबई । मागच्या काही दिवसापासून सोन्यासह चांदीच्या किमतीने वाढ होताना दिसून आली. दरात सतत वाढ होत असल्यामुळे अनेक ग्राहकांनी सराफा दुकानांकडे पाठ फिरवली होती. मात्र, आज दरवाढीला ब्रेक लागला आहे. १५ जुलै रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. आजची घसरण पाहता ग्राहकांसाठी ही एक दिलासादायक बातमी ठरू शकते.
भारतात सोन्याचा दर
मंगळवारी सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. भारतात २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ११ रूपयांनी घसरून ९,९७७ रूपये झाला आहे. १० तोळे सोन्याची किंमत १,१०० रूपयांनी घसरली, ९,९७,७०० रूपयांनी आज सराफा बाजारात व्यवहार करीत आहे. तर, २२ कॅरेट सोन्याचा दर १० रूपयांनी घसरून ९,१४५ रूपये प्रति ग्रॅम झाला आहे. तसेच १८ कॅरेट सोन्याचा दर ८ रूपयांनी घसरून ७,४८३ रूपये प्रति ग्रॅम झाला आहे.
सोन्याच्या दरात घसरण झाली असली तरी चांदी मात्र दिवसेंदिवस महाग होत आहे. आज प्रति ग्रॅम चांदी ४ रूपयांनी वाढून ११९ रूपये झाली आहे. तर प्रति किलो चांदी ४ हजाराने वाढून १,१९,००० वर पोहोचली आहे. औद्योगिक मागणी वाढल्यामुळे गेल्या आठवड्यातही चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली होती. मात्र, या आठवड्यातही चांदीच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र आहे.















Discussion about this post