जळगाव । ट्रम्प यांच्या टेरीफचा परिणाम थेट जळगावच्या सुवर्णनगरीवर झाला असल्याचं पाहायला मिळतंय. कारण गेल्या चोवीस तासात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असून यामुळे सोने दराने सगळे रेकॉर्ड मोडले आहे.
सोने दरात १५०० रुपयांची वाढ होऊन आज सोन्याचे दर हे जीएसटी (GST) शिवाय 1 लाख 600 तर जीएसटीसह हेच दर 1लाख 3 हजार 600 रुपये इतक्या उंचीवर जाऊन पोहोचले असल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, रशिया युक्रेन युद्धात भारत रशियाकडून क्रूड तेल खरेदी करत असल्याने, रशियाला युक्रेन युद्धासाठी मोठी आर्थिक मदत होत असल्याचा अमेरिकेने आरोप केलाय. तर भारताला रोखण्यासाठी अमेरिकेने भारतावर 25 टक्के टेरीफ रेट लावल्याने त्याचा परिणाम भारताच्या अर्थ व्यवस्थेवर होताना दिसत आहे. तसाच परिणामी आता सुवर्ण बाजारावर ही पाहायला मिळत आहे. सध्या वाढलेले सोन्याचे दर हे सर्व सामान्य ग्राहकांच्या आवाक्या बाहेरचे असल्याने ग्राहकांनी सोनेखरेदीकडे पाठ फिरविल्याचे पाहायला मिळतं आहे.
Discussion about this post