जळगाव । गुढीपाडवा सण अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर अनेकजण सोने-चांदीची खरेदी करतात. परंतु, यंदा पाडव्याला सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागण्याची चिन्हे आहेत. जळगाव सराफा बाजारात सोने आणि चांदीने महागाईची गुढी उभारली.
सराफा बाजारात सोन्या आणि चांदीच्या दराने पुन्हा मोठी उसळी घेतली असून किंमतींनी उच्चांक गाठला. जळगावच्या सराफ बाजारात इतिहासात पहिल्यांदाच सोने जीएसटीसह 92 हजार रुपयांवर तर चांदीचे दर 1 लाख 5 हजार रूपयापर्यंत पोहोचले आहे.
सोन्याचे दर (विना जीएसटी) 89 हजार 700 रुपये तर चांदीचे दर 1 लाख 2 हजारांवर पोहोचले आहेत. गुढीपाडव्याच्या दोन दिवस आधी सोन्याच्या दरात वाढ झाल्याने ग्राहकांचा हिरमोड झाल्याचा पाहिला मिळत आहे.
रशिया युक्रेन युद्ध, आंतरराष्ट्रीय बाजारात निर्माण झालेली अस्थिरता, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेले निर्णय तसेच 2 एप्रिल रोजी यूएसए चा सेलिब्रेशन दिवस असल्याने ट्रारिफ रेट लागु होणार असल्याची शक्यता अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या परिणामामुळे सोन्याच्या दरात वाढ झाली असल्याच सुवर्ण व्यवसायिक यांचे म्हणणे आहे..
Discussion about this post