नवी दिल्ली : गेल्या महिन्यात डोंगर गाठलेल्या सोने आणि चांदीच्या दरात सध्या किंचित दिलासा मिळताना दिसत आहे. अक्षय्यतृतीयेपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण होत असून सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण नोंदवली गेली
चालू आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी १५ मे रोजी सोन्याच्या दरात घसरण झाली. बुधवारी २४ कॅरेट आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव ४०० रुपयांनी कमी झाला. अशाप्रकारे दिल्लीत १० ग्रॅम सोन्याचा दर ७२,९६० रुपये तर चांदीचा भाव ८७,३०० रुपये असून देशातील इतर काही मोठ्या शहरांमधील सोन्याची किरकोळ किंमत जाणून घेऊया.
दिल्ली-मुंबईसह तुमच्या शहरात सोने-चांदीचे दर
दिल्लीत १५ मे २०२४ रोजी २२ कॅरेट सोन्याची किंमत ६६,७६० रुपये प्रति १० ग्रॅम तर, २४ कॅरेट सोन्याची किंमत ७२,९६० रुपये आहे. त्याचवेळी मुंबईत २२ कॅरेट सोन्याची किंमत ६७,१४० रुपये प्रति १० ग्रॅम, तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ७३,२४० रुपये असून अहमदाबादमध्ये २२ कॅरेट सोन्याची किरकोळ किंमत ६६,७९० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २४ कॅरेट सोन्याचा भाव ७२,८६० रुपये आहे.
देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा भाव
शहर – २२ कॅरेट – २४ कॅरेट
चेन्नई – ६६,८९० – ७२,९७०
कोलकाता – ६६,७४० – ७२,८१०
गुरुग्राम – ६६,८९० – ७२,९६०
लखनौ – ६६,८९० – ७२,९६०
बेंगळुरू – ६६,७४०- ७२,८१०
जयपूर – ६६,८९० – ७२,९६०
पाटणा – ६६,७९० – ७२,८६०
भुवनेश्वर – ६६,७४० – ७२,८१०
हैदराबाद – ६६,७४० – ७२,८१०















Discussion about this post