मुंबई । दिवाळीनंतर लग्नसराईचा काळ सुरू झाला आहे. लग्नसराई आणि सणासुदीच्या काळात भारतात सोन्याच्या दागिन्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. दरम्यान गेल्या आठवड्यात सोन्याच्या तसंच चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळाली होती. मात्र या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचे दर वाढले होते. कालच्या दिवशी म्हणजेच बुधवारी सोन्याचे भाव वधारले असून आज मात्र सोन्याच्या किमतीत कोणाताही बदल झालेला नाही. त्यामुळे जर तुम्ही सोनं घ्यायचा विचार केला असेल तर आज घेऊ शकता.
Goodreturns वेबसाईटनुसार, गुरुवारी म्हणजेच आज १२ डिसेंबर रोजी सोन्याच्या दरात बदल झालेले नाहीत. 24 कॅरेट १०० ग्रॅम सोन्याची किंमत 7,96,200 रूपये इतकी आहे. महाराष्ट्रातील विविध भागात काय आहे सोन्याचा भाव जाणून घेऊया.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,300 रुपयांना विकलं जात आहे.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 58,400 रुपयांवर आहे.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 73,000 रुपये इतका आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 7,96,200 रुपये किंमतीने विकलं जातंय.
१० ग्रॅम सोन्याचा भाव आज 79,620 रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 63,696 रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं 7,962 रुपयांनी विकलं जात आहे.















Discussion about this post