जळगाव : आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे सोने आणि चांदीचे दर सातत्याने वाढताना दिसत आहे. यामुळे दोन्ही धातूंच्या किमतींनी ऐतिहासिक उसळी घेतली आहे. जळगाव सुवर्ण बाजारात गेल्या महिन्याभरात सोन्याच्या दरात सहा हजारांची वाढ झाली आहे. कालच्या व आजच्या दराचा विचार करता सोन्याच्या दरात ८०० रुपयांची तर चांदीच्या दरात एक हजारांची वाढ झाली आहे.
सध्या सोन्याचा दर ‘जीएसटी’सह ७३ हजार ५४२ रुपये प्रतीतोळा तर चांदी ८४ हजार ४६० पोचली आहे. गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने सोने खरेदी ग्राहक मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. यंदा मात्र सोन्याने ७३ हजारांचा टप्पा गाठल्याने या विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. वाढत्या दरवाढीला ग्राहक कसा प्रतिसाद देतात, उद्या कसा प्रतिसाद देतील याकडे सुवर्णबाजाराचे लक्ष लागून आहे.
२९ मार्चला सोन्याचा दरात वाढ होऊन सोने ७० हजारांवर गेले होते. सोन्याने प्रती तोळा (दहा ग्रॅम) ‘जीएसटी’सह ७० हजारांचा टप्पा पार केला होता. सुवर्ण बाजारातील या उच्चांकांमुळे सर्वजण चक्रातून गेले आहेत. एकीकडे लग्न सराई, दुसरीकडे आगामी काही दिवसांत लोकसभा निवडणुका या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात वाढ होत असल्याने आगामी काळात सोन्याचे महत्त्व अधिकाधिक अधोरेखित होणार आहे.















Discussion about this post