जळगाव । सध्या देशभरात लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. या हंगामात सोन्या चांदीची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. मात्र, दिवसेंदिवस सोनं विक्रमी पातळी गाठत आहे. सध्या जळगावच्या सुवर्णगरीत सोन्याच्या दरात (Gold Price) विक्रमी वाढ होताना दिसतेय. सोन्याच्या दराने सर्व विक्रम मोडले आहे. जळगावात सोन्याचा भाव 74 हजार रुपयांच्या पुढे गेला आहे.
जळगाव सराफा बाजारात एप्रिल महिन्यात सोनं तब्बल 6,750 रुपयांनी महागलं आहे. सध्या सोन्याचा भाव 74 हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. पुढच्या काही दिवसात सोन्याचे दर हे 75 हजार रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, सध्या देशातील वायेद बाजारात सोन्याने 73 हजार रुपयांचा टप्पा गाठला आहे.
सोन्याच्या किमतीने विक्रमी पातळी गाठल्याने सोन्याची खरेदी करावी की नको? असा प्रश्न ग्राहकांच्या मनात निर्माण होत आहे. कारण मोठ्या प्रमाणात झळ सर्वसामान्यांच्या खिशाला बसत आहे. त्यामुळं सध्या सोनं घेणं परवडत नाही.
इराण-इस्राईलच्या युद्धाचा दरावर परिणाम
इराण-इस्राईलच्या युद्धामुळं जगभरातील वातावरण तणावात आहे. याचा परिणाम सोन्याच्या दरावरही होत आहे. कारण सुरक्षीत गुंतवणूक म्हणून सोन्याकडं बघितलं जाते. त्यामुळं मोठ्या बँका सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. याचा परिणाम दरावर होत असल्याचे दिसत आहे. तसेच जागतिक बाजारातील मजबूत ट्रेंडमुळे सोन्याच्या दरातही वाढ होतेय.















Discussion about this post