नवी दिल्ली । आज बुधवारी पुन्हा एकदा भारतीय सराफा बाजारात तेजी दिसून आली. आज सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 160 रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात 350 रुपयांची वाढ झाली आहे.
यानंतर सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,633 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,600 रुपये प्रति दहा ग्रॅमवर गेला. त्याच वेळी, चांदीच्या दरात वाढ झाल्यानंतर तो 74,540 रुपये प्रति किलो झाला आहे.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, सोने सध्या 0.31% म्हणजेच 185 रुपयांच्या वाढीसह 59,573 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेंड करत आहे. तर आधी त्याची किंमत ५९,५८० रुपयांच्या उच्च पातळीवर पोहोचली होती. सोन्याचा किमान भाव 59,480 रुपये होता. दुसरीकडे, MCX वर चांदी 0.51% (रु. 377) च्या वाढीसह 74,320 रुपये प्रति किलोवर ट्रेंड करत आहे.
प्रमुख शहरातील दर
राजधानी दिल्लीत सोन्याची (22 कॅरेट) किंमत प्रति दहा ग्रॅम 54,413 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 59,360 रुपये प्रति दहा ग्रॅम झाली. तर चांदीचा भाव प्रतिकिलो 74,220 रुपये आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा दर 54,505 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,460 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. दुसरीकडे, चांदीचा भाव येथे 74,340 रुपये प्रति किलोवर चालू आहे.
कोलकात्यात सोन्याचा (22 कॅरेट) भाव 54,432 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. त्याच वेळी, 24 कॅरेट सोने 59,380 रुपये प्रति दहा ग्रॅमने विकले जात आहे. चांदीचा भाव येथे 74,250 रुपये प्रति किलो आहे. चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोने 54,661 रुपये आणि 24 कॅरेट सोने 59,630 रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे. तर चेन्नईमध्ये चांदीचा भाव 74,560 रुपये प्रतिकिलो आहे.
Discussion about this post