मुंबई । सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक खुशखब आहे. मे-जून महिन्यात सोने-चांदीचा भाव झरझर खाली उतरला असून जागतिक घडामोडींच्या परिणामी सोने आणि चांदी खाली दबावाखाली आल्याने भाव तीन महिन्यांच्या निच्चांकावर घसरला आहे.
रशियातील बंड आणि रशिया-युक्रेन युद्धाचा मोठा परिणाम जागतिक बाजारात दिसून येत असताना देशांतर्गत सराफा बाजारातही सकारात्मक परिणाम होताना दिसत आहे. आज सोन्याच्या दरात सातत्याने घसरण झाल्यानंतर आता पुन्हा तेजी आली आहे.
जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे दोन्ही मौल्यवान धातू दबावाखाली आले, ज्याचा परिणाम देशांतर्गत सराफा बाजारातही दिसून येत आहे. गुडरिटर्न्सच्या ताज्या अपडेटनुसार आठवड्याच्या दुसऱ्या व्यवहार दिवशी २२ कॅरेट सोन्याच्या दरात कोणताही बदल झाला नसून २४ कॅरेट सोने १०० रुपये प्रति १० ग्रॅम स्वस्त झाले आहे. अशा स्थितीत आज २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्यासाठी तुम्हाला ५४ हजार ३५० रुपये तर २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्यासाठी ५९,१८० रुपये मोजावे लागतील. दुसरीकडे, १ किलो चांदीचा भाव ७०,९०० रुपयांवर अपरिवर्तित राहिला आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीची किंमत
जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ नोंदवली आहे. कोमॅक्सवर सोन्याची किंमत प्रति औंस $१९३८ वर तर चांदीही हिरव्या चिन्हात व्यवहार करत आहे. कोमॅक्सवर चांदीची किंमत प्रति औंस $२२.९८ वर व्यवहार करत आहे.
Discussion about this post