मुंबई । भारतात सणासुदीचे दिवस सुरु झाले की सोन्याची मागणीही तितकीच वाढते. दसरा, धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्याचे दागिने खरेदी करणे शुभ मानले जात असून आज दसऱ्याचा शुभ दिवस आहे. मात्र दसऱ्याचा मुर्हुतावर सोन्याचा भाव वधारला आहे. यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. आज (12 ऑक्टोबर 2024) हे बदल किती रूपयांनी झाले आहेत जाणून घेऊयात
देशातील मोठ्या शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,000 रुपयांच्या पुढे व्यापार करत आहे. हा वाढता दर सोने बाजारासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. सोन्याच्या किंमतीत होणाऱ्या या वृद्धीचा परिणाम बाजारातील अस्थिरता आणि जागतिक आर्थिक घडामोडींवर दिसून येत आहे.
Goodreturns वेबसाईटनुसार, शुक्रवारी (11 ऑक्टोबर 2024) 24 कॅरेट 10 ग्रॅम (1 तोळा) सोन्याचा भाव 77,400 रूपयांवर पोहोचला होता. पण आज यामध्ये 270 रूपयांनी वाढ झाली असून याची किंमत 77,670 रूपये झाली आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा भाव 70,950 रूपये होता. जो 250 रूपयांनी वाढला असून त्याची किंमत 71,200 रूपये झाली आहे.
त्याचबरोबर एक किलो चांदीची किंमत 97,000 रूपयांवर पोहोचली आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे भारतात सोने-चांदीच्या दागिन्यांच्या किंमती बदलत असतात.