मुंबई । सोने आणि चांदी दरात चढ उतार सुरु आहे. जर तुम्ही आज सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आहे.आज सोमवारी सोन्यासह चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे. जागतिक स्तरावरील तणावातून काही प्रमाणात दिलासा मिळाल्याने दोन्ही धातूंच्या किमतीत घसरण झाली आहे.
आज २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,०२,००० रुपये आणि २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ९२,७४० रुपये दराने विकले जात आहे. चांदी देखील १०० रुपयांनी घसरून १,१६,१०० रुपये प्रति किलो झाली आहे.
दरम्यान भारतीय शेअर बाजारात मागील आठवड्यात सोनं आणि चांदीच्या दरात किंचितसे बदल झाले होते. सोन्याच्या किंमतीत ९०० रुपये प्रति १० ग्रॅमने अधिक घसरण झाली होती. तर चांदीच्या किंमतीत २०० रुपयांनी अधिक वाढ झाली होती. मात्र या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भाव घसरण झाले असून आगामी सणासुदीत सोन्याचे दर कुठवर जाणार याकडे ग्राहकांचे लक्ष लागून राहणार आहे.















Discussion about this post