जळगाव । जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सोनं आणि चांदीच्या दरात चढ-उतार नोंदवले जात आहेत. २४ कॅरेट सोन्याचे दर सोमवारी प्रति १० ग्रॅम १,१३३ रूपयांनी वाढले होते, तर आज मंगळवारी सकाळी बाजार उघडल्यावर आणखी ५१५ रूपयांची वाढ झाली. यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,६१,१९५ रूपये पर्यंत पोहोचले.
दुसरीकडे, चांदीच्या दरात सलग चढ-उतार सुरू आहेत. शनिवारी चांदी दर ८,२४० रूपयांनी वाढून प्रति किलो २,६८,८३० रूपये झाले होते. मात्र सोमवारी १,०३० रूपयांची घट नोंदवली गेली, तर आज मंगळवारी सकाळी ५,१५० रूपयांची वाढ झाली. परिणामी चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो २,७२,९५० रूपये झाले.
आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींचा थेट परिणाम सराफा बाजारावर होत आहे. गुंतवणूकदार सध्या अधिक सावध भूमिका घेताना दिसत आहेत. विशेषतः अमेरिकेतील महत्त्वाच्या आर्थिक आकडेवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या आठवड्यात जाहीर झालेला रोजगार बाजाराचा अहवाल आणि चलनवाढीचा (महागाईचा) डेटा आगामी काळातील अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर धोरणाची दिशा ठरवणारा ठरणार आहे.















Discussion about this post