मुंबई । काही दिवसांवर नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळी सण येऊन ठेपला असून मात्र त्यापूर्वी सोन्यासह चांदीच्या किमतीने मोठी उसळी घेतली आहे. सध्या पितृपक्ष सुरू असून यातच सोन्याच्या दरानं उच्चांकी गाठली आहे. त्यामुळे सराफांच्या दुकानांकडे ग्राहकांची पावलं वळणार की नाही, याकडे सध्या सर्वांचेच लक्ष आहे.
सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ७७१ रूपयांची वाढ झाली आहे. २४ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,११,२८० रूपये मोजावे लागतील. तर, २४ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात ७,७१० रूपयांची वाढ झाली आहे. २४ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ११,१२,८०० रूपये मोजावे लागतील. या दरवाढीमुळे सामान्यांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार आहे.
तर, २२ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ७०० रूपयांची वाढ झाली आहे. २२ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १,०२,००० रूपये मोजावे लागतील. तर, २२ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात ७,००० रूपयांची वाढ झाली आहे. २२ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला १०,२०,००० रूपये मोजावे लागतील.
२४,२२ सह १८ कॅरेट सोन्याच्या दरातही लक्षणीय वाढ पाहायला मिळत आहे. १८ कॅरेट १० ग्रॅम सोन्याच्या दरात ५८० रूपयांची वाढ झाली आहे. १८ कॅरेट १ तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ८३,४६० रूपये मोजावे लागतील. तर, १८ कॅरेट १०० ग्रॅम सोन्याच्या दरात ५,८०० रूपयांची वाढ झाली आहे. १८ कॅरेट १० तोळं सोनं खरेदीसाठी आपल्याला ८,३४,६०० रूपये मोजावे लागतील.
सोन्यासह चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदीच्या दरात २,१०० रूपयांची वाढ झाली आहे. १ किलो चांदी खरेदीसाठी आपल्याला १,३२,००० रूपये मोजावे लागतील.















Discussion about this post