सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ होताना दिसत असून चांदीच्या किमतीने आजपर्यंतचे सगळे रेकॉर्ड तोडले आहे. यामळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठी झळ बसली आहे. दरम्यान आज आठवड्याच्या पाहिल्या दिवशी सोन्यासह चांदीच्या किमतीत घसरण झाली आहे.
आज सोन्याच्या किंमतींमध्ये १०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा २२ कॅरेट सोनं आज ६८,५४० रुपये आहे, २४ कॅरेट सोनं ७४,७६० रुपये प्रति तोळा आणि १८ कॅरेट सोनं ५६,०८० रुपये प्रति तोळ्याने विकलं जातंय. भाव कमी झाल्यानो गुंतवणूकदारांसाठी ही चांगली संधी आहे.
आज चांदीच्या भावातही घसरण झाली. आज प्रति किलो चांदीची किंमत ९३,००० रुपये आहे.
अन्य शहरांतील २२ कॅरेट १ ग्राम सोन्याचा आजचा भाव
चेन्नईत आज २२ कॅरेट १ ग्राम सोनं ६,८४९ रुपये
नवी दिल्लीत २२ कॅरेट १ ग्राम सोनं ६,८५४ रुपये
कोलकत्तात २२ कॅरेट १ ग्राम सोनं ६,८९० रुपये
अहमदाबादमध्ये २२ कॅरेट १ ग्राम सोनं ६,८४४ रुपये
Discussion about this post