जळगाव | सोमवारी सोने आणि चांदीच्या दरवाढ वाढ झाली होती. मात्र दुसऱ्याच दिवशी मंगळवारी दोन्ही धातुंच्या दरात पुन्हा मोठी घसरण झाल्यानं ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत घडामोडींमुळे सोन्याच्या दरांवर थेट परिणाम होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.काल सोमवारी दिवसभरात पुन्हा १३३९ रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने सोन्याने तीन टक्के जीएसटीसह एक लाख ३७ हजार ५०५ रूपयांचा नवीन उच्चांक केला होता. मात्र, मंगळवारी बाजार उघडल्यावर १३३९ रूपयांची पुन्हा घट झाली. त्यामुळे सोने जीएसटीसह एक लाख ३६ हजार १६६ रूपयांपर्यंत खाली आले.
दुसरीकडे सोमवारी दिवसभरात ५१५० रूपयांची वाढ नोंदवली गेल्याने चांदी जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ८५० रूपयांपर्यंत महागली होती. मात्र, मंगळवारी सकाळी बाजार उघडल्यावर ३०९० रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदी जीएसटीसह एक लाख ९७ हजार ७६० रूपयांपर्यंत खाली आली.















Discussion about this post