मुंबई । उद्या म्हणजेच २३ जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मात्र याच्या एक दिवस आधी शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली.त्याचसोबतच सराफा बाजारात देखील मौल्यवान किमती घसरलेले दिसून आले. सोन्याच्या दरात 130 रुपयांची किंचित घसरण दिसून आली, तर चांदीच्या दरात 510 रुपयांची घसरण झाली. यानंतर 22 कॅरेट सोन्याचा भाव 67,118 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,220 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तर चांदीचा भाव 89,350 रुपये प्रति किलो झाला आहे.
MCX वर धातूंची स्थिती काय आहे?
जर आपण मल्टी कमोडिटी एक्स्चेंजबद्दल बोललो तर येथेही सोन्या-चांदीच्या किमती घसरत आहेत. येथे सोन्याचा भाव 0.14 टक्क्यांनी म्हणजेच 105 रुपयांनी घसरून 72,885 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आहे. तर चांदीचा भाव 0.54 टक्क्यांनी घसरून 484 रुपयांनी 89,162 रुपये प्रति किलो झाला आहे.
देशातील प्रमुख शहरांमधील सोने चांदीचे दर
दिल्लीत सोन्याचा (22 कॅरेट) भाव प्रति दहा ग्रॅम 66,880 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,960 रुपये प्रति दहा ग्रॅमवर आला आहे. तर चांदीचा भाव 89,040 रुपये प्रति किलो झाला आहे. मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 67,008 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,100 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. येथील चांदीचा भाव 89,230 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
कोलकाता येथे 22 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 66,926 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,010 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर चांदीचा भाव 89,110 रुपये प्रति किलो झाला आहे. चेन्नईमध्ये सोन्याचा (22 कॅरेट) भाव 67,210 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 73,320 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. तर चांदीचा भाव 89,490 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.















Discussion about this post